शुक्राणुंची गुणवत्ता वाढवण्यासाठी होमिओपथी उपचार

(Homeopathic remedies to increase sperm quality In Marathi)

नमस्कार मी डाॅ. वसीम चोधरी आज आपण एजुस्पर्मिया(Azoospermia) म्हणजेच शुक्राणुंची(Sperm) कमतरता या विषयावर बोलणार आहोत.
या मध्ये आपण एजुस्पर्मिया(Azoospermia) म्हणजे काय? हा आजार कसा ओळखावा? याची कारणे कोणती? या आजाराची लक्षणे काय आहेत आणि या आजारावर कोणती आैषधे गुणकारी आहेत हे पाहणार आहोत

एजुस्पर्मिया म्हणजे काय ?-(What Is Azoospermia In Marathi)

एजुस्पर्मिया म्हणजेच शुक्राणु नसणे जेंव्हा आपण परीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला त्याचा काउंट झिरो दाखवतो. हे सहजासजी दिसून येत नाही.जेंव्हा एखादे दांपत्य लग्न झाल्यानंतरही मूल होत नाही म्हणून उपचार करण्यासाठी येतात त्यावेळी वेगवेगळया टेस्ट केल्यानंतर ही गोष्ट समोर येते. एजुस्पर्मिया(Azoospermia) का होते हे आपण जाणून घेऊया याचे तीन प्रकार आहेत पहिला म्हणजे प्री टेस्टीक्युलर, टेस्टीक्युलर, पोस्ट टेस्टीक्युलर ह्या प्रकारात ती विभागली जाते. पहिला प्रकार म्हणजे प्री टेस्टीक्युलर या मध्ये यामध्ये देखील तीन प्रकार आहेत पहिला प्रकार हार्मोन्स जर हार्मोन्स व्यवस्थित कार्यान्वित न झाल्यास एजुस्पर्मिया(Azoospermia) होऊ शकतो.दुसरा प्रकार म्हणजे इंडोक्राईन ग्लॅड यामध्ये जर हार्मोन्सची वाढ व्यवस्थित न झाल्यास एजुस्पर्मिया(Azoospermia) होऊ शकतो. टेस्टीक्युलर या प्रकारात
वेगवेगळे इन्फेक्शन, विषाणू इम्फेक्शन(Viral Infection) मुळे एजुस्पर्मिया होऊ शकतो. जसेकी आॅरकायटिस(Orchitis), व्हेरिकोसील(Varicocele),अॅपेडिडीमासिक( epididymitis),युरोथ्रायटिस(urethritis), अनडिसीस टेस्टीस(undescended testicle) त्याचबरोबर मानसिक अशांतता, डायबीटीस(Daibetes) आणि इतर कारणांमुळे एजुस्पर्मिया(Azoospermia) होतो.

पोस्ट टेस्टीक्युलर म्हणजे काय?-(What Is post-testicular In Marathi)

वाझा डिफरन्स असल्यास एजुस्पर्मिया(Azoospermia) होऊ शकतो.त्याचबरोबर नसबंदी हे एक कारण आहे. शिवाय जर शुक्राणु(Sperm) आपल्या मुत्रनलिकेत(urethra) जात असतील तर त्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो.

आजाराची लक्षणे -(Azoospermia Symptoms In Marathi)

या आजाराची ठराविक अशी लक्षणे नाहीत.त्यामुळे हा सहजासहजी ओळखता येत नाही साधारणपणे एखादे व्यसन, मानसिक आजार, एखादा दीर्घकाळ असलेला आजार, तारुण्यात झालेल्या चुका यामुळे हा आजार होऊ शकतो.
आता आपण या आजाराला कसे ओळखायचे हे जाणून घेऊया या आजाराला एकमेव पद्धतीने ओळखले जाऊ शकते ती पद्धत म्हणजे स्पर्मची गुणवत्ता तपासने यामध्ये आपण स्पर्म तपासणी देऊन त्याद्वारे त्याची गुणवत्ता, प्रमाण याबद्दल माहिती घेऊ शकतो. आता आपण या आजारावर कोणती आैषधे उपयुक्त आहेत हे जाणून घेऊया यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपथी डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या समस्या सांगा जेणेकरून तुम्हाला योग्य सल्ला दिला जाईल. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या आजाराच्या बाबतीत तुम्ही स्वताहुन कोणतेही उपचार चालु करु नका.

या आजारावर लक्षणांच्या आधारावर एग्नस कॅटस क्यु(Agnus Castus) ही मेडीसीन फायद्याची आहे.
ही गोळी आपण दिवसातून दोन ते तीन वेळा घेऊ शकता.ही आपल्याला प्री मॅच्युअर इलॅक्युशन या प्रकारात गुणकारी ठरते. दुसरी गोळी डायमेनिया क्यु ही मेडीसीन तुम्हाला मानसिक आकारामुळे या आजाराची लागण झाली असेल तर ही मेडीसीन फायद्याची आहे.
एनाकार्डिया ३० ह्या चार गोळ्या तुम्ही दिवसातून तीन वेळा घेऊ शकतात.ही मेडीसीन सुद्धा या आजारावर फायदेशीर आहे.त्याचबरोबर इतर मेडीसीन देखील आपण या आजारावर घेऊ शकतो. पण त्यासाठी लक्षाणे जाणून घेणे महत्वाचे आहे. हा इतर आजारांप्रमाणे एक आजार असल्याने याचा उपचार सहजरित्या शक्य आहे. तुम्हालाही जर कोणती समस्या असेल तर तुम्ही मला काॅल करु शकता मेल किंवा व्हाट्सअप देखील करू शकता.