रोसासिआ म्हणजे काय?
रोसासिआ हा त्वचेचा एक जटील आजार आहे. जटील यामुळे कि या आजाराचे लवकर निदान होत नाही व हा बराही होत नाही. चेहेऱ्यावर दिसणाऱ्या मुरुमाला सामान्य मुरूम समजून उपचार केले जातात हेच या मागचं लवकर निदान न होण्याचं कारण आहे. रोसासिआ हा शब्द लॅटिन आहे. याचा अर्थ ‘गुलाबाप्रमाणे लाल’ असा होतो. त्वचेवर येणाऱ्या लाल रंगाच्या मुरुमांना रोसासिआ अॅक्ने असं म्हणतात.या त्वचा विकारात प्रामुख्याने मुरुमांना रक्तपुरवठा होण्यासाठी कायमस्वरूपी केश्वाहिका वाढतात,यामुळे हि मुरमं लाल रंगाची दिसतात. सामान्यता वय वर्षे ३०-३५ वयोगटातील महिलांमध्ये हा विकार आढळून येतो. या आजाराचे वैशिष्ठ म्हणजे चेहरा सोडून अन्यत्र कुठेही पुरळ किंवा मुरूम दिसत नाहीत. कपाळ,गाल,हनुवट हि चेहेऱ्यावरील ठिकाणे आहेत ज्यावर लाल रंगांची पुरळ उमटतात.
रोसासिआची प्रमुख लक्षणे
- लाल रंगांची मुरूम.
- काही मुरुमंनमध्ये पु झालेला दिसतो.
- रोसासिआ झालेला भागाला सूज दिसते.
- इतर त्वचा खरखरीत.
- शरीराचा आणि चेहेर्याचा रंग वेगळा दिसतो.
- बरे झालेल्या मुरुमाच्या ठिकाणी डाग दिसतात.
- मुरुमाच्या जागी जळजळणारी संवेदना.
रोसासिआची कारणे
रोसासिआ हा कोणत्या विशिष्ट जैविक जंतू प्रादुर्भावाने होत नाही परंतु खालील घटक हे रोसासिआ होण्यासाठी कारणीभूत मात्र नक्की ठरतात.
- रक्तवाहिन्यातील जन्मजात विकृती.
- नाशेली दर्व्ये,जसे कि दारू,रेड वाईन इत्यादी चे अतिरेकी सेवन.
- तापमानातील बदल.
- अति व्यायाम
- त्वचेवर दुष्परिणाम करणाऱ्या औषधांचे सेवन.
होमिओपॅथी आणि रोसासिआ
होमिओपॅथी म्हणजे रोग नाही रोगाचे कारणच नष्ट करणारी औषध प्रणाली मानली जाते. रोसासिआला काही निवडक होमिओपॅथीक औषधे ही चांगलाच आळा घालतात हे प्रयोगाने सिद्ध झालेले आहेत. तर पाहूयात कोणती होमिओपॅथीक औषधे रोसासिआवर चांगला परिमाण करतात.
होमिओपॅथी मध्ये पुढील औषधांचा वापर केला जातो,
१.बेलाडोना (Belladonna) – चेहरयावर लालसर पणा तसेच उष्णता यासाठी हे उत्तम मेडिसिन आहे.
२.कारबो वेज (Carbo veg) – लालसरपणा, नसा दिसत असतील, सुजन असेल तर हे औषध दिले जाते.
३.हेपर सलफ (Hepar sulph) – पसयुक्त पुरळ कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.
४.लचेस (Lachesis) – लालसरपणा कमी करण्यासाठी, उष्णता कमी करण्यासाठी, जळजळ कमी करण्यासाठी, नसा व चेहरयावर सुरु असेल तर हे उत्तम औषध आहे.
५.सोरियम (Psorinym) – उष्णता, लालसरपणा, पसयुक्त छोटे पुरळ यासाठी दिले जाते.
६.इजुनिया जंबो (Eugenia Jambos) – वेदनादायक पुरळ असतील, जळजळ कमी करण्यासाठी या मेडिसिन चा उपयोग होतो.
७.सल्पर (Sulphar) – लालसरपणा, सुमन, जळजळणे, नसा दिसणे यावर हे उत्तम औषध आहे.
८.हायडरोकोटल असटिका (Hydrocotyle Asciatica) – पसयुक्त पुरळ मुळे त्वचा कठीण तसेच खरखरीत झालेली असते. यावर उपयोगी मऊपणा आणण्यासाठी.
९.Euphrasia Officinalis – डोळयांची जळजळ होणे, पाणी येणे, टोचणे यावर उपयोगी औषध.
अशाप्रकारे होमिओपॅथी चे नैसर्गिक उपचार करून आपण रोसेसिया वर मात करू शकतो. अधिक माहिती साठी होमिओपॅथी डॉक्टरांना भेट द्या आणि वेळीच उपचार घ्या.
Please select text to grab.