ॲलर्जी: लक्षणे, कारणे,व होमिओपॅथी उपचार-(Allergies: Symptoms, Causes, and Homeopathic Treatment)

Allergies: Symptoms, Causes, and Homeopathic Treatment

ॲलर्जी: लक्षणे, कारणे,व होमिओपॅथी उपचार-(Allergies: Symptoms, Causes, and Homeopathic Treatment In Marathi)

कितीही नवनवीन सोयी सुविधा आल्या तरीही अ‍ॅलर्जीने(Allergies) त्रस्त असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. जसा जसा निसर्गाचा र्हास झाला, माणूस सिमेंटच्या जंगलात राहू लागला, त्याच्या शरीरावर परिणाम दिसू लागले. रोगप्रतिकारशक्ती क्षीण झाल्यानंतर बाहेरील संसर्गाला तोंड देण्यास शरीर असमर्थ ठरते. त्यामुळे संसर्गाची लागण लगेच होते आणि त्रास होतो त्यालाच अ‍ॅलर्जी म्हणतात.

ॲलर्जीची कारणे :-(Allergies Causes In Marathi)

प्राण्यांचे केस, विष्ठा, घरातील धूळ, त्वचेवरचा संसर्ग, तंतुमय केस, सल्फा, अंडी, दूध, गहू, डाळ, डास चावणे, मधमाशीचा दंश, घरातील झुरळे ही ॲलर्जीची प्रमुख कारणे आहेत. वाढते प्रदूषण,धूळ, फळांवर कीटकनाशकांचा वापर, हिरव्या पालेभाज्यांच्या वाढीसाठी व ताजेतवाने ठेवण्यासाठी कृत्रिम रसायनांचा वापर या कारणांमुळेही अ‍ॅलर्जीचे(Allergies) प्रमाण वाढत आहे. शहरांत प्रतिजैविकांचा अतिरिक्त वापर, स्टिरॉइडचे वाढते सेवन हे आरोग्यासाठी त्रासदायक ठरत आहे. याशिवाय ही अनेक कारणे कारणीभूत ठरू शकतात. एखादा सुवासिक अत्तर किवा धूप ही एखाद्याच्या ॲलर्जीचे कारण ठरू शकते.

ॲलर्जीची लक्षणे :-(Allergies Symptoms In Marathi)

ॲलर्जीचे(Allergies) वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणे दिसून येतात. प्रत्येकाची कारणे पाहून त्यावर उपचार सांगितले जातात. अंगावर खाज येणे, बारीक पुरळ उठणे,वारंवार शिंका येणे, नाकातून, डोळ्यातून पाणी येणे, त्वचेवर लालसर चट्टे येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक चोंदणे, सतत सर्दी, खोकला येणे, थंडी वाजणे , बारीक ताप येणे , वेगवगळे श्वसनविकार अशी विविध लक्षणे ॲलर्जीमुळे उद्भवू शकतात.

ॲलर्जी वर होमियोपॅथिक उपचार:-(Homeopathic Treatment Forb Allergies In Marathi)

ॲलर्जी(Allergies) हवेतून, श्वसनमार्ग, पचनमार्ग आणि त्वचेतून होऊ शकते. शरीरावर ॲलर्जी(Allergies) ही सौम्य किंवा तीव्र स्वरूपात येते. खुपदा ॲलर्जी(Allergies) चा स्त्रोत कुठला हे शोधणे अवघड होऊन बसते कारण कोत्याही एका ठराविक कारणामुळेच हा त्रास होतोय असे सांगणे अवघड असते. म्हणून होमियोपॅथिक उपचार यावर खूप प्रभावी ठरतात. ही पद्धती तीनशे वर्षे जुनी आहे. या पद्धतीत फक्त आजाराचाच नव्हे तर संपूर्ण शरीराचा अभ्यास करून मूळ कारण शोधले जाते आणि त्यानुसार औषधोपचार केले जातात.

डॉक्टर तपासताना रुग्णाचा पूर्ण इतिहास आणि जीवनशैली पाहून औषधे देतात. ॲलर्जीमध्ये(Allergies) खालील काही औषधांचा वापर होतो. उदा. एलीयम रोपा, स्पॉन्जिया, अर्जंट मेटॅलिकम, ब्रोमिअम, इन्फुएन्स रस्टाक्स, इ. औषधांचा वापर होतो. होमियोपॅथीमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त गुणकारी औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे कधीही होमियोपॅथी औषधे घेतना डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि दिलेलेया प्रमाणानुसार घेणे योग्य ठरते.

 

डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह ॲलर्जी(Allergies)  असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक(Homeo Care Clinic) सुरू केले आहे.  तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील क्लिनिकला आजच भेट द्या..

होमिओ केअर क्लिनिकमध्ये(HOmeo Care Clinic) होमिओपॅथीमधून बरेच रुग्ण बरे होतात. तुम्हाला काही आरोग्य समस्या असल्यास, तुम्हाला विशेष आहार योजनेचे पालन करावे लागेल. डॉ.वसीम चौधरी यांनी विविध आजारांचा संपूर्ण आहार तक्ता(Diet Chart) दिला आहे