कोमल त्वचेसंबंधित समस्यांसाठी होमिओपॅथीचे उपाय

HOMEOPATHY TREATMENT FOR SENSITIVE SKIN

निरोगी त्वचेची ओळख म्हणजे तिचे चमकणारे स्वरूप तसेच त्वचा कोमल मऊ असणे देखील महत्वाचे आहे. लहान बाळांची त्वचा पाहिल्यास ती खूप हवीहवीशी वाटते, पण जसे मोठे होतो त्वचेचा कोमलपणा निघून जातो. प्रौढ झाल्यावर तर त्वचा आणखी खराब होते. त्यामुळे चेहरा निर्जीव आणि थकलेला दिसु लागतो. त्यावर उपाय म्हणून आपण अनेक वेगवेगळ्या क्रीम्स घेऊन येतो आणि त्याचा मारा करतो. पण कधी कधी त्याचाही उलट परिणाम होतो.  

त्वचा आणखी रुक्ष होते. म्हणून त्वचेसाठी योग्य वेळी योग्य तज्ञांकडून उपचार करून घेणे महत्वाचे आहे. 

 

कोमल त्वचेची लक्षणे कोणती?

खालील प्रमाणे लक्षणे दिसल्यास तुमची त्वचा संवेदनशील किंवा कोमल आहे हे समजून घ्यावे. 

 

  1. लाल, सुजलेली आणि खाज सुटलेली त्वचा कोरडी दिसते.
  2. त्वचेचा अति लालसरपणा 
  3. आग होणारी त्वचा
  4. पुरळ किंवा अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी
  5. कोरडी त्वचा ज्यामध्ये पु , फोड किंवा रक्तस्त्राव होऊ शकते
  6. त्वचेचे ठिपके जे कोरडे, कडक आणि चामड्यासारखे वाटतात
  7. त्वचेवर कारणाशिवाय  बारीक पुरळ उठणे 

 

संवेदनशील त्वचेची लक्षणे विविध प्रकारे दिसू शकतात

 

1. इरिटंट कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस – संवेदनशील त्वचेचा सर्वात सामान्य प्रकार, यामुळे त्वचेच्या संरक्षणात्मक बाह्य स्तराला नुकसान होते .कशाचाही संपर्कात  संपर्कात आल्यानंतर फोड किंवा  पुरळ तयार होतात.

 

2. ऍलर्जिक कॉन्टॅक्ट डर्माटायटिस – यामध्ये ठराविक रसायनामुळे  ऍलर्जी येते आणि त्रास होतो.

 

3. एक्जिमा (एटोपिक डर्माटायटीस) –  यामध्ये सर्व जुने त्वचारोग येतात. आधी कुठलाही त्रास दिसत नाही पण नानात्र त्वचा सुजते आणि लाल होते . यात त्वचेला आग होते.

 

कोरडी त्वचा असल्‍याने संवेदनशील त्वचेची लक्षणे दिसू शकतात, कारण कमी आर्द्रतामुळे त्वचेचे बाह्य उत्तेजक घटकांपासून संरक्षण किती कमी होते.

 

होमिओपॅथीमध्ये त्वचा ऍलर्जी औषधे

 

1.  Apis mel. 200 (tds) – त्वचेच्या ऍलर्जीसाठी जे उष्णतेमुळे  होते तसेच जेव्हा लालसरपणा आणि जळजळ होते. उष्णतेची ऍलर्जी असल्यास हे औषध चांगले आहे 

 

2. अर्जेंटम निट. (tds) – कोणत्याही ऍलर्जीमुळे त्वचा रोग. त्वचा सुकते आणि कडक होते.

 

3. आर्सेनिकम अल्ब (tds) – सर्दीमुळे त्वचेच्या ऍलर्जीसाठी. कोल्ड ड्रिंक्सची ऍलर्जी असल्यास त्वचा फाटते तेव्हा हे औषध उपयोगी आहे.

 

4. कोक्युलस इंड. (tds) – सूर्याच्या उष्णतेमुळे पुरळ आणि चक्कर येते. तीव्र उनामुळे त्वचा काळवंडते त्यासाठी हे प्रभावी ठरेल.

 

5. सल्फर 200 (hs) – वातावरणात होणारे बदल हे अनेक प्रकरच्या  त्वचा समस्या निर्माण करतात म्हणून  बर्याच त्वचा विकारांवर हे प्रभावी ठरते. 

 

6. थायरॉयडिनम – हे औषध विविध प्रकारच्या त्वचा ऍलर्जीवर काम करते. उदाहरणा अर्थ क्रीम किंवा  लिपस्टिकची ऍलर्जी असेल तर हे फायदेशीर ठरेल.

 

कुठल्याही त्वचेवर उपचार करताना होमिओपॅथीक डॉक्टर तपासणी करतात. रुग्णाला किती वर्ष हा त्रास होतो, त्याचे खाणे पिणे कसे आहे, त्याला कोणत्या प्रकारच्या कपडे किंवा बाह्य घटकामुळे त्रास होऊ शकतो याविषयी प्रश्न विचारले जातात. बर्याचदा त्वचा विकार हे अधिक जुने असल्यास त्यावर उपाय करायला वेळ लागू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे डोस घेणे उपयुक्त ठरेल. योग्य वेळेत त्वचा संबंधी समस्येवर उपचार केल्यास सर्व विकार नष्ट होतील व त्वचा कुठल्याही वयात तजेलदार दिसू शकेल.

x

Please select text to grab.