हाता-पायाला मुंग्या(tingling hands and feet)
हाता-पायाला मुंग्या येणे याला वैद्यकीय भाषेत पॅराथिसिया अस म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मुंग्या येणे म्हणजे एका स्तिथीत राहिल्यामुळे शरीराचा विशिष्ठ भाग सुन्न पडणे होय. उदारणार्थ – झोपेमध्ये अंगाखाली हात येऊन हाताचा भाग सुन्न पडणे. पायावर बसल्यामुळे पायाला मुंग्या येणे. जास्त वेळ कॉम्पुटर वर काम केल्यामुळे हाताला मुंग्या येणे. खूप वेळ पाय दुमडून बसल्यास किंवा एकाच स्थितीत बराच वेळ झोपल्यामुळे पाय किंवा हात सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात. म्हणजे अवयवाला मुंग्या येतात तेव्हा त्या अवयवाच्या एखाद्या नसेवर ताण येतो आणि त्यावेळी तिथला रक्तपुरवठा काही वेळा साठी बंद होतो त्याने तिथे मुंग्या आल्या सारखं होत. परंतु त्या अवयवाची हालचाल केल्यावर तिथला रक्तपुरवठा पुन्हा चालू होतो व थोड्या वेळाने मुंग्या येणे थांबते.
परंतु कधीकधी हाता-पायाला मुंग्या येणे लवकर थांबत नाही किंवा वारंवार मुंग्या येणे हे कुठल्याही आजाराचे गंभीर लक्षण असू शकते.
हाता-पायाला मुंग्या येण्याची काही प्रमुख कारणे(Some of the main causes of tingling hands and feet in marathi)
- आजकाल च्या कॉम्पुटर वर च्या कामामुळे एकाच स्थितीत खूप वेळ बसून राहावे लागते,त्यामळे सुद्धा मुंग्या येऊ शकतात. कधी कामानिमित्ताने एकाच जागेवर उभं राहिल्याने मुंग्या येऊ शकतात. काम बसून असल्यास मधून उठून फेरफटका मारावा.
- अतिमद्यपान हे देखील मंग्या येण्याचे कारण आहे. हात पाय अशक्त दिसणे, हाताच्या पायाची बोटे यामध्ये संवेदना न जाणवणे.
- आहारात पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, फळे, दूध यांचा समावेश नसल्यमुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता होते. त्यामुळे देखील शरीराच्या विशिष्ठ भागाला मुंग्या येऊ शकते.
- खूपदा आपण बसण्याकडे तितकसं लक्ष देत नाही. आपण खुर्चीत बसताना अथवा खाली बसताना चुकीच्या पद्धतीत बसल्याने सुद्धा मुंग्या येतात.
- खूप लोकांना अतिप्रमाणात गोड खाण्याची सवय असते. पण ते शरीरासाठी योग्य नसते. अतिप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते त्याने सुद्धा मुंग्या येतात.
- गरोदरपणात स्त्रियांना हाता पायांना मुंग्या येण्याचा जास्त त्रास होतो.
हाता-पायाला मुंग्या यावर होमिओपॅथिक उपाचार(Homeopathic Remedy for tingling hands and feet in marathi)
मुंग्या येणे ही साधी गोष्ट असली तरी वारंवार मुंग्या येणे हे शरीरासाठी हानिकारक आहे. वारंवार जर हातापायाला मुंग्या येत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. होमिओपथिमध्ये यावर उपाय आहेत. योग्य वेळी उपचार घेतल्याने डॉक्टर हा त्रास औषधापाचाराने आणि काही जीवनशैलीत बदल केल्याने दूर करू शकतात.
होमिओ केअर क्लिनिक:
डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या.