ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी या दोन्ही औषधांचा उपयोग हा आजार बरा करण्यासाठी केला जातो. ॲलोपॅथी हे तत्काळ इलाजासाठी तर होमिओपॅथीला इलाज होण्यासाठी वेळ लागतो असे मानले जाते. दोन्ही उपचार पद्धतीमुळे रुग्णाला आराम मिळू शकतो. परंतु आजही होमिओपॅथीसाठी अनेक शंका असतात. या इलाजावर काही प्रश्न आहेत. म्हणन आजच्या लेखात आपण दोन्हीमधला मुख्य फरक समजून घेऊ.
ॲलोपॅथी म्हणजे काय(What is Allopathy in Marathi)?
ऍलोपॅथी ही अशी वैद्यकीय टर्म आहे जी पाश्चात्य किंवा आधुनिक पध्दतीमध्ये गणली जाते. यामध्ये फक्त ज्या गोष्टीचा त्रास होतोय किंवा जी लक्षणे आहेत त्यावर उपचार केले जातात. पण, या पद्धतीत औषधांचे खूप सारे दुष्परिणाम शरीराच्या इतर भागावर होतात. उदाहरणच सांगायचे झाले तर, वैद्यकीय उपचारांमध्ये प्रतिजैविक, वेदना कमी करणारी औषधे, मायग्रेनची औषधे आणि अगदी केमोथेरपी, मधुमेहावरील औषधे आणि शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. वरील सर्व प्रकारच्या औषधांचे काही ना काही साईड इफेक्ट होतात. या साईड इफेक्ट मुळेच रोगी या उपचार पद्धतीवर शंका घेतात.
होमिओपॅथी म्हणजे काय(What is Homeopathy in Marathi)?
होमिओपॅथी मध्ये जिथे रोगाचे मुळ आहे तेच संमुळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे अगदी ॲलोपॅथीच्या विरूध्द प्रकारे काम करत असते. यामध्ये असेही सिध्द होते की, जास्त डोस पेक्षा कमी डोस सुध्दा परिणाम कारक ठरू शकतात. होमिओपॅथी चे डोस हे नैसर्गिक पदार्थांपासून बनलेले असतात. जसे की ही औषधेही सहसा अर्निका, बेलाडोना, झेंडू, शिसे, लॅव्हेंडर, फॉस्फोरिक ऍसिड यांसारख्या नैसर्गिक पदार्थाचा उपयोग करून बनवलेली असतात.
ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी मधला फरक(Difference Between Allopathy and Homeopathy in Marathi):-
या दोन्ही पद्धतींचा मेन उद्देश आजार बरा करणे हाच असतो. तरीही दोन्हीच्या पद्धतीत बराच फरक आहे. आता आपण तो फरक पाहूया.
ॲलोपॅथी उपचार(Allopathy Treatment in Marathi)-
आजारापासून बचाव करणे आणि तो पुर्णतः बरा करणे हा उद्देश ॲलोपॅथी मध्येही असतो. उदाहरण द्यायचे झाले तर कोविड-१९ च्या लसीचे देता येईल जी हा आजार होऊ नये म्हणून शोधण्यात आली होती. याच प्रकारे प्रीडायबेटीज, ब्लडप्रेशर आणि ॲंटी इन्फेक्शन जे नेहमीच आजारापासून बचाव करण्यासाठीही ॲलोपॅथी मध्ये वापरले जातात.
होमिओपॅथी उपचार(Homeopathy Treatment in Marathi)-
अगदी लहान डोस मार्फत तूमची प्रतिकारक्षमता मजबूत बनविण्याचा या उपचार पध्दतीत प्रयत्न केला जातो. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती अनूसार या औषधांचे डोस बदलत असतात. यामध्ये औषधी वनस्पती आणि टॉनिक बनवताना ते किती समर्थनीय आहे यावर देखील संशोधन केले जाते. तरीही या उपचार पद्धतीचे साईड इफेक्ट अजून तरी दिसत नाहीत.
होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी यांच्यातील वाद भविष्यातही सुरू राहणारच आहेत. कोणताही उपचार प्रत्येकासाठी योग्य नसला तरी, या दोन्ही वैद्यकीय पध्दतींवर संशोधन सुरू आहे. जे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे उपचार शोधण्यासाठी एकत्र काम करत असतात आणि रोगाची लक्षणे रोखत असतात.
होमिओ केअर क्लिनिक(Homeo Care Clinic):
डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या.