त्वचेच्या टॅगसह जगणे: काढण्यासाठी होमिओपॅथिक पर्याय

Skin tags

स्किन टॅग म्हणजे त्वचेवर होणारी वाढ  जी तुमच्या त्वचेवर कुठेही  दिसू शकते. यामध्ये त्वचा मूळ भागापासून लटकलेली दिसते. ही वेदनारहित असते. याला  ऍक्रोकॉर्डन असे वैद्यकीय नाव आहे. यापासून काही त्रास होत नसला तरी अनेकांना ती अस्वस्थ करते. आणि त्यामुळेच तिला काढण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात.  हे  स्किन टॅग बऱ्याचदा मानेवर, पापण्यांवर किंवा हाताखालील बगलेत  विकसित होतात. त्यांचा रंग तुमच्या त्वचेसारखा किंवा गडद असू शकतो. काहीवेळा  गुलाबी असतात . 

 

कधीकधी स्किन टॅग  दागिन्यांवर किंवा कपड्यांवर, त्वचेवर  काही काळ घासत असल्यामुळे इतर ठिकाणी सुद्धा वाढताना आढळतात. जसे कि स्तन (खाली), डोळ्यांच्या पापण्या, मांडीच्या आतल्या बाजूस, मानेच्या भोवताली, अंडरआर्म्स, पोटावर किंवा पाठीवर दिसू शकतात.

 

ज्या लोकांचे वजन जास्त असते, गर्भवती किंवा सैल त्वचा असते त्यांना त्वचेचे टॅग होण्याची शक्यता असते. पण निश्चित कारण सांगता येत नाही.

 

स्त्रिया आणि पुरुष दोघांमध्येही त्वचा टॅग विकसित होतात. ते निरुपद्रवी आणि सामान्यत: वेदनारहित असतात. त्यांचा  आकार 1 मिमी ते 5 सेमी पर्यंत असतो. त्वचेचे टॅग सर्व सामान्य लोकांमध्ये 46% दिसून आलेले आहेत.  मधुमेह, उच्च रक्तदाब, अतिरिक्त चरबी, किंवा वाढलेली कोलेस्टेरॉल पातळी असल्यास तसेच  आई वडील आजी आजोबा यांना  त्वचेचे टॅग्ज असल्यास पुढच्या पिढीला त्वचेचे टॅग होण्याचा धोकाही जास्त असतो.

 

त्वचेचा टॅग फक्त काढून टाकणे कधी  आवश्यक असते? 

 

  1. जर त्यावर खाज येते आणि त्यातून अधिक रक्तस्त्राव होतो. 
  2. काही टॅग पापणीवर आल्याने बघायला अडचण होते .
  3. काही टॅग वेदनादायक होतात. 
  4. त्वचेचा टॅग दागिने, कपडे किंवा सीट बेल्टवर वारंवार घासल्यामुळे त्रासदायक ठरत असतील तर ते काढू शकता. 

 

त्वचेच्या टॅगसह काढण्यासाठी होमिओपॅथिक उपाय

 

होमिओपॅथिक औषधे त्वचेचा टॅग काढण्यास फायदेशीर ठरतात.  होमिओपॅथी औषधांमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. हे टॅग कायमस्वरूपी काढले जातात. खालील काही औषधे होमिओपथी डॉक्टर सुचवतात.  पण लक्षात ठेवा, ही औषधे तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत नाहीतर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.

 

  1. स्टॅफिसाग्रिया ३० – स्टेफिसेग्रिया हा कोरड्या आणि पेडनक्युलेटेड प्रकारच्या त्वचेच्या टॅगसाठी प्रभावी उपाय आहे. 
  2. THUJA OCCIDENTALIS 30 – Thuja occ हा त्वचेच्या टॅगसाठी सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे आणि  जर त्वचेवर तपकिरी डाग  असतील तरीही हे औषध उपयोगी पडते. विशेषतः मांडीवर दिसणाऱ्या त्वचेच्या टॅगसाठी हे प्रभावी आहे.
  3. कॉस्टिकम 1000 व नायट्रिक ऍसिड 30 – ही दोन्ही औषधे कॉस्टिकम त्वचेच्या टॅगसाठी सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे.  जर रक्तस्त्राव होत असेल तर हे औषध उपयोगी पडते..
  4. DULCAMARA 30 – Ducamara त्वचेचा  टॅग पापण्यांमध्ये दिसते तेव्हा हे औषध लिहून दिले जाते.  यामुळे रुग्णांना नक्कीच फायदा होतो.
  5. CALCAREA CARB 200 – हे औषध त्वचेच्या टॅगसाठी खूप प्रभावी मानले जाते. प्रामुख्याने चेहऱ्यावर  व हाताखाली  बगलेत जेव्हा टॅग  असतो  आणि तो वेदनादायक असतो  तेव्हा  हे दिले जाते . 

 

त्वचेचा टॅग काढण्यासाठी होमिओपॅथी उपचार महत्त्वाचे ठरतात. तज्ञ होमिओपथी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.  कारण प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. त्यामुळे रुग्णाच्या  प्रकृतीनुसार औषधे दिली जातात.

x

Please select text to grab.