परिचय
प्रत्येक वेळी ऋतू बदलतात तसे आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम जाणवू लागतो. ऋतूनुसार वेगवेगळ्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. विशेषतः हिवाळ्यामध्ये त्वचेच्या अनेक समस्या उदभवतात त्यामुळे हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात त्वचा कोरडी व रुक्ष होते. त्वचेतील नैसर्गिक चमक व ओलावा कमी होतो. हे टाळण्यासाठी काही टिप्स वापरून हिवाळ्यात त्वचेचे रक्षण करूया. सर्वप्रथम हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी ते बघू.
हिवाळ्यात त्वचेची काळजी
- प्रथम चेहरा स्वच्छ धुवावा. चेहरा धुण्यासाठी फेस वॉशचा वापर करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील धूळ, दुर्गंधी कमी होईल. टोनर म्हणून गुलाबापाण्याचा वापर करू शकता.
- कॉफी पावडर व नारळाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज केला व थंड पाण्याने चेहरा धुतला तर त्वचा खोलवर स्वच्छ होतेच शिवाय नारळाच्या तेलाने त्वचेतील ओलावा टिकून राहतो. रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो.
- हिवाळ्यात कोमट पाण्याने अंघोळ करावी- हिवाळ्यात अति गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेतील ओलावा कमी होतो व त्वचा कोरडी पडते. आंघोळीसाठी मॉइश्चरायझरयुक्त साबणाचा वापर करावा.
- भरपूर पाणी प्या- हवेत गारवा असल्याने हिवाळ्यात पाणी कमी प्रमाणात प्याले जाते. पाणी भरपूर पिण्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात व चेहरा तजेलदार दिसतो. तेव्हा रोज साधारण ३ लिटर पाणी प्यावे. यामुळे त्वचेतील ओलसरपणा टिकून राहतो.
- योग्य आहार घ्या- हिवाळ्यात भरपूर प्रमाणात पालेभाज्या,फळे उपलब्ध असतात. आहारात त्यांचा समावेश करावा. गाजर, टोमॅटो, कलिंगड यांचे रस घ्यावे. चहा, कॉफ़ी शकतो टाळावी. खारट, तळलेले पदार्थ खाऊ नये. याच्या सेवनाने त्वचा कोरडी होते. हंगामी फळांचा आहारात समावेश करावा. जास्त गरम पदार्थ देखील खाऊ नयेत.
- हिवाळ्यात अल्कोहोल घेणे टाळावे- हाताच्या त्वचेवर तैलग्रंथी कमी असतात. त्यामुळे तेथील त्वचा लवकर कोरडी होते. हातावर भेगा पडतात, खाज येते. हे टाळण्यासाठी हाताला मॉइश्चरायझर, क्रीम लावावे.
- लोकरी कपड्यांमुळे अंगाला खाज येत असेल तर सुती कपडे वापरावे.
- कोरड्या त्वचेमुळे हिवाळ्यात ओठ फुटण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी लिपस्टीक लावू नये. ओठांना लीप बाम अथवा व्हॅसलीन लावावे.
- भरपूर व्यायाम करा.- हिवाळा हा ऋतू तब्येत कमावण्यासाठी चांगला समजला जातो. थंड हवेमुळे घाम जास्त येत नाही व व्यायामामुळे थकवा जाणवत नाही. व्यायामामुळे शरीराला ऑक्सिजनचा व रक्तप्रवाहाच भरपूर पुरवठा होतो व त्वचेला नैसर्गिक चमक येते.
होमिओ केअर क्लिनिक:
डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या.