संधिवात(Arthritis) म्हणजे सांधेदुखी (joint pain )अर्थात सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे सांध्याना सूज येणे. वैद्यकीय भाषेत त्याला ‘आर्थरायटीस ‘असे म्हटल जात. वैद्यकीय शाश्त्रात 100 पेक्षा जास्त प्रकार सांगितले आहेत. संधिवात 40 शी नंतर होणारा आजार होता कारण या वयामध्ये आपल्या हाडाची झीज झालेली असते किवा त्यांनतर आपल्यातील कॅल्शियम चे प्रमाण कमी होत जाते, पण हल्ली तारुण्यात सुध्दा संधिवात झालेला दिसुन येतो म्हणजे आता संधिवात व्हायला वयाची मर्यादा राहिलेली नाही.
संधिवात(Arthritis) ची कारणे(Causes of Arthritis in Marathi)
संधिवात(Arthritis) होण्याची अनेक कारणे सांगितली जातात परंतु सर्वात महत्वाचे कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. तसेच, खालील काही कारणे संधिवात होण्यास कारणीभूत असू शकतात.
- शरीरातील वात वाढणे
- युरिक ऍसिड वाढणे
- व्यायामाचा अभाव किवा कोणते काम न करता सारखे बसून राहणे
- वजन जास्त असणे त्यामुळे सांध्यावर भार येऊन सांधी दुखू लागतात
- विषाणूजन्य आजार आधी होऊन गेलेला असणे किवा होणे. उदा. चिकनगुनिया
- अनुवांशिक दोष सुध्दा असू शकतो
- कॅल्शियमची कमतरता निर्माण होणे
- चुकीचा आहार म्हणजेच पोषक आहाराची कमतरता
यातील कोणत्याही एका कारणाने संधिवात होऊ शकतो.किवा झालेला असतो.
संधिवाताची लक्षणे(Symptoms of Arthritis in Marathi)
- सांध्यावर सूज येणे
- सांध्यामध्ये प्रचंड वेदना असणे
- हाडामध्ये कटकट असा आवाज होणे
- अवयवयाची हालचाल करण्यास त्रास होणे
ही प्रामुख्याने संधिवाताची लक्षणे आढळून येतात.
संधिवातावर होमिओपॅथी उपचार(Homeopathy Treatment for Rheumatoid Arthritis In Marathi)
होमियोपॅथीमध्ये आधी रुग्णाची पुर्ण माहिती अर्थात हिस्ट्री घेतली, कारण त्यांना त्या आजाराचे मुळ शोधायचे असते. होमिओपॅथी मध्ये pain किलर न देता रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी औषध दिले जातात ज्यामुळे त्या रुग्णात त्या रोगाशी लढण्याची ताकद येते.
खुप वेळा संधिवात असो किवा इतर आजार त्याचा अनपेक्षितरित्या मानसिक स्थितीशी संबंध असतो तो आपल्याला दिसत नाही पण होमिओपॅथीमध्ये मानसिक तणावाचे कारण शोधून कौन्सलिंग सुध्दा करण्यात येते त्यामुळे रुग्णाची मानसिक स्थिती सुधारून सकारात्मक विचार त्या व्यक्तीत यायला लागतो, योग्य आहार, विहार सोबत औषध याची योग्य सांगड घालुन होमिओपॅथीमध्ये उपचार दिले जातात त्यामुळे संधिवात बरा होऊ शकतो फक्त होमिओपॅथीमध्ये संयमाची नितांत गरज असते.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही योग्य सल्ल्याशिवाय फक्त ऐकून किवा वाचून होमिओपॅथीची औषधे घेऊ नये त्यासाठी या होमिओपॅथीचे योग्य डॉक्टर कडुनही ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णाला फायदा होईल. होमिओ केअर क्लिनिक मध्ये आजवर अनेक संधिवात रुग्णांवर प्रभावीपणे उपचार झालेले आहेत. तुम्हालाही लक्षणे असल्यास जरूर भेट द्या.
होमिओ केअर क्लिनिक:
डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या.